हॅम्बर्ग : सिरियाने जवळपास २५,००० टन कच्ची साखर खरेदी आणि आयात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा जारी केली आहे. निविदेअंतर्गत दराचा प्रस्ताव सादर करण्याची मुदत २३ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे.
याबाबत रॉयटर्स संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, निविदेतील मूल्य ऑफर युरोमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, सिरीयामध्ये खाद्य पदार्थाच्या किमती वाढत आहेत. सद्यस्थितीत देशाच्या अनेक भागात पाणी तसेच विजेचा पुरवठा अतिशय मर्यादीत आहे. याशिवाय, साखरेसह इतर खाद्य पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी आयात आयातीवर भर देण्यात येत आहे.