तामिळनाडू : जोरदार टीकेनंतर पोंगल गिफ्ट हॅम्परमध्ये ऊस देण्याचा निर्णय

चेन्नई : राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना पोंगल गिफ्ट हॅम्परमध्ये एक ऊस दिला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी केली. काही दिवसांपूर्वी सरकारने म्हटले होते की राज्यातील श्रीलंकन पुनर्वसन शिबिरांमध्ये राहणाऱ्यांसह रेशन कार्डधारकांना एक पोंगल गिफ्ट हॅम्पर दिला जाईल. यामध्ये एक किलो तांदूळ, एक किलो साखर आणि रोख एक हजार रुपयांचा समावेश असेल. डीएमकेच्या नेतृत्वाखालील सरकारने उसाला गिफ्ट हॅम्परमधून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात एआयएडीएमके, बीजेपी, एनटीकेसह अनेक राजकीय पक्षांनी जोरदार विरोध नोंदवला होता.

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष एआयएडीएमकेने घोषणा केली की सत्तारुढ सरकारचा निषेध करण्यासाठी २ जानेवारी रोजी तिरुवन्नामलाईमध्ये निदर्शनांचे आयोजन केले जाईल. मद्रास उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये राज्य सरकारला गिफ्ट हॅम्परमध्ये ऊसाचा समावेश करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, सरकारने जर पोंगल सणासाठी लोकांना भेट देण्यास ऊस खरेदी केला नाही, तर खूप नुकसान होईल असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. बुधवारी पत्रकारांशी बोलताना सहकार मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांनी सांगितले की, सार्वजनिक वितरण प्रणालीमधील (पीडीएस) दुकानांसमोरील लांब रांगा रोखण्यासाठी सरकार ३ ते ८ जानेवारी या काळात दुकानांवर टोकन वितरण करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here