तामिळनाडू : साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची एआयडीएमकेची मागणी

चेन्नई : मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मदुराई जिल्ह्यातील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी AIADMK चे समन्वयक ओ पनीरसेल्वम यांनी केली आहे. पन्नीरसेल्वन यांनी आधीच्या एआयडीएमके सरकारच्या कार्यकाळात कमी ऊस उपलब्धता आणि खराब हवामान, पाऊस असतानाही कारखान्याला ३९.३२ कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याची आठवण करून दिली आहे. यावेळी कारखाना कार्यक्षेत्रात जादा पावसानंतरही ६०,००० टन नोंदणीकृत ऊस आणि १७,००० टन नोंदणी नसलेला ऊस उपलब्ध आहे असे ते म्हणाले.

या युनिटला गळीत हंगाम सुरू करण्यासाठी २२ कोटी रुपयांची गरज असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले आहे.

गळीत हंगाम सुरू करण्यासाठीचे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. कारखाना पुन्हा सुरू केल्यास त्याचा फायदा १०,००० शेतकरी आणि ५०० कामगारांना होईल. याशिवाय वाहतूकदार, शेतमजूर यांसह इतर अनेक घटकांना याचा अप्रत्यक्ष फायहा होऊ शकतो असे पनीरसेल्वम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here