विल्लुपुरम: खाजगी साखर कारखान्यांकडून सहकारी साखर कारखान्यासाठी निश्चित केलेल्या क्षेत्रातून ऊसाची पळवापळवी करण्याच्या प्रकाराविरोधात चेंगलारायन को-ऑपरेटिव्ह शुगर मिल लिमिटेडचे जिल्हा महसूल अधिकारी (डीआरओ) यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. सहकारी साखर कारखान्याचे डीआरओ आर. मुथुमिनाक्षी यांच्या म्हणण्यानुसार, सध्या साखर कारखान्याकडे केवळ २.७५ लाख टन ऊस उपलब्ध आहे. अशा स्थितीत खासगी साखर कारखानदार मध्यस्थांच्या मदतीने विशेषत: सहकारी कारखान्यासाठी निश्चित केलेल्या क्षेत्रातून नोंदणीकृत आणि नोंदणीकृत नसलेल्या ऊसाची पळवापळवी करत आहेत.
महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखान्यांसाठी निश्चित केलेल्या क्षेत्रातून ऊस पळवला जात आहे. सहकारी कारखान्यासाठी उसाची उपलब्धता राखण्यासाठी खाजगी कारखान्यांना नोंदणीकृत आणि नोंदणी नसलेला ऊस नेण्यास बंदी घातली आहे. सहकारी कारखान्यांसाठी आरक्षित क्षेत्रातून नोंदणी न केलेल्या ऊसाची वाहतूक करणाऱ्या खासगी साखर कारखान्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित वाहने जप्त करून दलालांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.