नमक्कल : गेल्या दहा वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या आधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे. कारखाने अद्ययावत करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
Newindianexpress.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार तामीळनाडू केळी उत्पादक संघाचे सचिव आणि ऊस उत्पादक जी. अजीतन यांनी सांगितले की, कारखान्यांच्या आधुनिकीकरणाची खूप गरज आहे. देशात २० ते २५ टक्के साखर कारखाने सहकारी आहेत. निधी नसल्याने कारखान्यांचे आधुनिकीकरण केले गेलेले नाही. कारखान्याने विक्री केलेली अथवा गहाण ठेवलेली साखर शेतकऱ्यांचे पैसे अथवा कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास असमर्थ आहेत. जोपर्यंत ऊस शेती क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत, तोपर्यंत साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारणार नाही. त्यामुळे खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यास सुरुवात केली आहे. जर सरकारला खरोखरच सहकारी साखर कारखाने सुधारण्याची गरज वाटत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त बियाणे, शेतीसाठी संबंधीत अनुदान देऊन ऊस क्षेत्राचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.
सलेम सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी संघाचे सचिव ओ. पी. कुप्पुथुराई यांनी सांगितले की, हवामानातील बदल, पाण्याचा तुटवडा आणि वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शेतीतील रस कमी होत चालला आहे. २०२१-१२ नंतर मोहनूर सहकारी साखर कारखाना ४.५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठू शकलेला नाही. गेल्या वर्षी, पहिल्यांदा कोविड लाटेच्या वेळी साखर कारखान्याने सॅनिटायझरचे उत्पादन केले. त्यासाठी ९५ रुपये प्रती लिटर खर्च आला. आम्ही हे सॅनिटायझर १५० रुपयांनी विक्री करण्यास सुचविले होते. मात्र अधिकाऱ्यांनी ३०० रुपये दर निश्चित केला. आणि इथे हजारो लिटर सॅनिटायझर शिल्लक राहिले. आता अधिकारी हे सॅनिटायझर १५० रुपये प्रती लिटरने विक्री करू इच्छितात. मात्र कोणीही खरेदीदार पुढे येत नाही असे, त्यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link