तिरुची : ऊस, केळी, सुपारी अशा नकदी पिकांसाठी मेट्टूर जलाशयातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी तिरुची जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. सध्या तिरुची जलाशयात शंभर फुटापेक्षा अधिक पाणीसाठा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मेट्टूर जलाशयातून जवळपास १५०० क्सुसेक पाणी शहर आणि आणि आसपासच्या शहरांच्या पाणीपुरवठा योजनांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मेट्टूर बंधारा आणि कल्लनई यांदरम्यानच्या १७ पाणी पुरवठा योजनांद्वारा उत्पादन केल्या जाणाऱ्या सुपारी, केळी, ऊस अशा पिकांसाठी जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध ठेवावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तमीळनाडू विवासायगल संगमचे जिल्हा सचिव आयिलाई शिवा सुरियान यांनी सांगितले की, कावेरी नदीतून सरासरी १५०० ते ३००० क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडण्याची गरज आहे. हे पाणी पिण्यासह पिकांसाठी वार्षिक स्वरुपात पुरेसे होऊ शकते.
गेल्या दशकापासून बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा नसल्याचे सांगत नॉन मेट्टूर हंगामात अवघे ५०० ते १००० क्युसेक पाणी सोडण्यात येते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून येथील पाणीसाठा १०० फुटांपेक्षा अधिक आहे. तरीही शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याचे आयिलाई शिवा सुरियान यांनी सांगितले. कमी पाणी सोडले जात असल्यान उन्हाळ्याचा काळातील शेती पूर्णपणे बंद झाली आहे. अचानक येणारा पाऊस, विविध महामारी यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान दुर्लक्षित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारने उइयाकोंडान आणि कट्टलाई या उच्च स्तरावरील कालव्यांतून सिंचनासाठी पुरेसे पाणी सोडण्याचे धोरण ठरविण्याची गरज आहे असे मत सुरियान यांनी व्यक्त केले.