तमिळनाडू: पलाकोड साखर कारखान्याच्या गाळपाचा कालावधी वाढविण्याची मागणी

धर्मपुरी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे पलाकोड येथील धर्मपुरी जिल्हा सहकारी साखर कारखान्याच्या (डीडीसीएसएम) गाळपाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, येथे आणलेल्या १,५०० टनाहून अधिक उसाचे गाळप करण्यात आलेले नाही. आणि कारखाना सुरू केल्यास ऊस उताऱ्यात सुधारणा होईल.
धर्मपुरी जिल्ह्यातील पलाकोडमध्ये डीडीसीएसएम आणि गोपालपुरम येथे सुब्रमण्य शिव सहकारी साखर कारखाना (एसएससीएसएम) असे दोन कारखाने आहेत. २०२२ मध्ये जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे २०,००० हून अधिक एकर क्षेत्रात चांगले ऊस पिक आले आहे. दरम्यान, शुक्रवारी DDCSM ने हंगाम २०२२-२३ मधील आपल्या गाळपाची समाप्ती केली.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी को जनरेशन युनिटमधील अडचणी आणि बॉयलरमधील तांत्रिक बिघाडामुळे पलाकोड कारखान्यात काही अडचणी आल्या. त्यामुळे जवळपास १० दिवस गाळप बंद राहिले. सद्यस्थितीत येथे १५०० टनाहून अधिक ऊस गाळपाविना आहे. तमिलगा विवसईगल संगम एसए चिन्नास्वामीचे प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे की, सध्याच्या आकडेवारीनुसार, DCSM ने १०% च्या उताऱ्याने जवळपास दोन लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. एसएससीएसएम कारखाना १० मेपरयंत गाळप करेल. प्रलंबित ऊस गाळपातील उशीर झाल्यास उताऱ्यावर परिणाम होईल. याशिवाय, किमती कमी होतील. DDCSM च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रलंबित ऊस गोपालपुरममध्ये SSCSM ला पाठविला जाईल. शेतकऱ्यांना ऊस दराबाबत चिंता करण्याची गरज नाही. कारण उसाचे वजन करून त्याचा आढावा घेतला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here