धर्मपुरी : पलाकोडमधील धर्मपुरी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ड्रोनचा वापर करून ऊसाच्या शेतांमध्ये खत, किटकनाशके आणि औषधांच्या वापराबाबत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आणि याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. या उपाययोजनेमधून शेतकऱ्यांचे श्रम कमी करणे, वेळेची बचत आणि शेतकऱ्यांना बाजारातील नव्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे.
पलाकोडमध्ये धर्मपुरी जिल्हा सहकारी साखर कारखाना लिमिडेट हा सर्वात मोठा कारखाना आहे. याची प्रती दिन ऊस गाळप क्षमता ६,३०० टन आहे. दहा वर्षांपूर्वी कारखान्याकडून प्रती वर्ष सरासरी २.५० लाख टन ऊस गाळप केले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षात ऊस उत्पादनात घसरण होत असल्याचे दिसून आले आहे. आणि यावर्षी कारखान्याने केवळ १.३० लाख टन उसाचे गाळप केले आहे. शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करण्यासासाठी प्रोत्साहन देण्यासह नव्या तंत्रज्ञानाबाबत शिक्षण देण्यासाठी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ड्रोन आणि हवेतून औषध फवारणीचे आयोजन केले होते. ड्रोनच्या वापराने हवेतून तरल युरिया आणि पोटॅश यांची फवारणी करता येते आणि केलेली फवारणी पानांवर करण्यात येते. त्याचा थेट लाभ पिकाला मिळतो. एक एकर जमिनीवर २० मिनीटांपेक्षा कमी कालावधीत हे काम केले जाऊ शकते. याशिवाय, वापरल्या जाणाऱ्या औषध, किटकनाशक, खतामध्येही बचत केली जाते.