मदुराई : Tamil Nadu Sugarcane Farmers Association च्या अधिपत्याखालील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सरकारने अलंगनल्लूर येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
ऊसाच्या पुरवठ्यातील कमतरतेसह विविध कारणांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना २०१९ मध्ये बंद करण्यात आला होता. ऊस उत्पादक शेतकरी आणि स्थानिक मंत्री पी. मूर्ती यांच्या पाठपुराव्यामुळे साखर कारखान्यातून उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठीच्या व्यवहार्यतेचे परिक्षण करणे आणि व्यवस्थापन पाहण्यासाठी खास अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. २५ जून रोजी अलंगनल्लूरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषी मंत्री एम. आर. के. पन्नीरसेल्वम यांनी सांगितले होते की, राज्य सरकार अलंगनल्लूरमधील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करेल. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, कारखाना सुरू झाल्यानंतर पुरेसा ऊस देणे ही त्यांची जबाबदारी राहील. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले की, साखर कारखान्यांमध्ये उत्पादन सुरू होण्याची शक्यता नाही. निदर्शनांनंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.