तामीळनाडूतील धर्मपुरीत घटली ऊसाची शेती, मजुरांच्या टंचाईने शेतकरी हवालदिल

धर्मपुरी : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कामगारांच्या कमतरतेमुळे ऊस तोडणीत उशीर होत आहे असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रसाची गुणवत्ता घटणार असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नवर होणार आहे. आधीपासूनच जिल्ह्यातील ऊस शेतीत घट होत आहे. २०११ मध्ये ७००० हेक्टरमध्ये ऊस शेती केली जात होती. मात्र, आता ती जवळपास ३००० हेक्टरवरच येऊन ठेपली आहे. पाऊस आणि कामगारांची टंचाई यामुळे जिल्ह्यातील ऊसाचे लागवड क्षेत्र सातत्याने घटत आहे.

द न्यू इंडियनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की दीर्घ कालावाधीनंतर गेल्या दोन वर्षात पुरेसा पाऊस झाला आहे. त्यामुळे आम्हाला ऊस शेती करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. मात्र, आता ऊस तोडणीसाठी कामगार जादा पैशांचा मागणी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत ऊस तोडणी केलेली नाही. आता ऊसाला तुरे येत आहेत. त्यामुळे गाळप करताना त्याचे वजन घटेल. सध्या शेतकऱ्यांना कारखान्यांकडून प्रती टन ३००० रुपयांपेक्षा थोडे अधिक पैसे मिळतात. मात्र, वाहतूक आणि तोडणी शुल्क यातच समाविष्ट असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही पडत नाही. या कारणामुळेही धर्मपुरीतील ऊस शेती घटत आहे. अनेक शेतकरी पालकोडमध्ये सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here