तामीळनाडूत ऊस उत्पादकांसाठी राज्याचे १५० कोटी अनुदान

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

 चेन्नई : चीनी मंडी

तामीळनाडू राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १५० कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यानच्या हंगामातील चालू उत्पादन अनुदान म्हणून ही रक्कम जाहीर करण्यात आली आहे. अनुदानाची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केली जाणार आहे. राज्य सरकारने घेतलेला हा अनुदानाचा निर्णय भविष्यात, रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलवर उसाची किंमत ठरवण्याच्या दिशेने सुरुवात असल्याचे मानले जात आहे.

तामीळनाडूमध्ये २०१७-१८ च्या हंगामात १०३.७६ कोटी रुपये अनुदान देण्यात आले होते. त्याचा १ लाख १५ हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ झाला होता. यात सहकारी आणि खासगी कारखान्याला ऊस दिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश होता.

नियमानुसार केंद्र सरकार आपल्याकडे एफआरपी जाहीर करते. त्यानुसार ९.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी उतारा असलेल्या उसाला २ हजार ६१२.५० रुपये दर तामीळनाडूमध्ये लागू करण्यात आला. दरम्यान, राज्य सरकारने स्टे अडव्हायजरी प्राइस २ हजार ७५० रुपये जाहीर केली. त्यामुळे ऊस दरात प्रति टन १३७ रुपये ५० पैसे फरक येत आहे. परिणामी राज्य सरकारने चालू उत्पादन अनुदानाच्या माध्यमातून ही तूट भरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी राज्याने १५० कोटी रुपयांची स्वतंत्र अनुदान जाहीर केले आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here