तामिळनाडू : तामिळनाडू सरकारने तंजावर, तिरुवरूर, नागपट्टिनम आणि मायलादुधुराईमध्ये सतत झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत निधीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी प्रती हेक्टर २०,००० रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. जर पिकाचे ३३ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर ही मदत मिळणार आहे. जर अवकाळी पावसाने लवकर पिक खराब झाले असेल तर त्यांना ३००० रुपये दिले जाणार आहेत, अशी घोषणाही स्टॅलिन यांनी केली.
यादरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि ते आपल्या पिकाची तातडीने कापणी करू इच्छितात, त्यांना कृषी इंजिनीअरिंग विभागाच्या माध्यमातून ५० टक्के अनुदानासह भाड्याने मशीनरी दिली जाईल.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीच्या पॅकेजमध्ये हरभरा पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना ५० टक्के अनुदानावर ८ किलो काळ्या हरभऱ्याचे बियाणे दिले जाईल. यापूर्वी रविवारी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. ते म्हणाले की, अवकाळी पावसाने कावेरी खोऱ्यातील एक लाख हेक्टर क्षेत्रातील भाताची पिके पाण्यात बुडाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भात खरेदीच्या निकषात सवलत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.