तामिळनाडू : साखर कारखाना देणार लवकर ऊस बिले

तिरुपूर, तामिळनाडू : अमरावती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने (Amaravathi Co-Op Sugar Mills) ने गळीत हंगामामध्ये खरेदी करण्यात आलेल्या ऊस बिलाचा पहिला हप्ता शुक्रवारी जारी करणार आहे, असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले.

याबाबत द न्यू इंडियन एक्स्प्रेस (TNIE) मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अमरावती सहकारी साखर कारखान्याने ऊस बिले देण्यास ६० दिवसांपासून अधिक काळ उशीर केला आहे. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, ३ मे ते ३ जुलैपर्यंत अमरावती साखर कारखान्याने ६६४ उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या ४२,५४६ टन उसाचे गाळप केले आहे. मात्र, कारखान्याने ३१० शेतकऱ्यांना ऊस बिले दिली आहेत. आणि आता जवळपास ७.५५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
याबाबत, TNIE सोबत बोलताना तामिळनाडू शेतकरी संघ (उदुमलाईपेट) चे सचिव बाला धंदापन यांनी सांगितले की, जवळपास ७०,००० टनाहून अधिक गाळप क्षमता असलेली अमरावती साखर कारखाना तिरुपुरमध्ये एक मोठा कारखाना आहे. मात्र, आधुनिकीकरणातील कमतरता आणि इतर कारणांमुळे याची गाळप क्षमता कमी झाली आहे. अमरावती को-ऑप शुगर मिल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक के. शनमुगनाथन यांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ऊस बिले देण्याचे आश्वासन दिले आहे. २८ जुलै रोजी १.२ कोटी रुपये आणि ४ ऑगस्ट रोजी ५५ लाख रुपयांची बिले शेतकऱ्यांना दिली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here