टांझानिया: कोणालाही साखर आयात परवाने न देण्याचा निर्णय

डोडोमा: कोणत्याही परिस्थितीत साखर आयातीसाठी परवान दिले जाणार नाहीत, असे टांझानियाचे कृषी मंत्री अॅडोल्फ मकेंडा यांनी स्पष्ट केले. स्थानिक उत्पादकांना अडचणीत आणणारे आणि खासगी स्वार्थासाठी साखर आयातीची परवानगी देण्यासाठी मंत्रालयावर दबाव आणणाऱ्या व्यावसायिकांना स्पष्ट निर्देश देताना कृषी मंत्री म्हणाले, प्रसंगी मी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, कोणालाही साखर आयातीची परवानगी दिली जाणार नाही.

मंत्री मकेंडा हे एनबीएसद्वारे आयोजित पाचव्या राष्ट्रीय सांख्यिकी जनगणनेच्या (एनएससीए) प्रारंभप्रसंगी बोलत होते. मंत्री मकेंडा म्हणाले, साखर आयातीच्या परवान्यासाठी अनेक व्यावसायिक मंत्रालयाशी संपर्क साधत आहेत. बाहेरील देशांमधून साखर आयात केली जात असताना साखर उत्पादन करणे हे आव्हानात्मक आहे. कारण देशांतर्गत साखरेचे उत्पादन स्थानिक गरज भागविण्यासाठी पुरेशी आहे असे मकेंडा यांनी सांगितले. किलोम्बेरो शुगर्सकडून ५७६ बिलियनची गुंतवणूक केली जात आहे. ही देशांतर्गत साखर उत्पादन दुप्पट करू शकेल असा विश्वास कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here