डोडोमा : पुढील वर्षी सरकारने स्थानिक साखर उत्पादक कंपन्यांना साखर आयातीचे परवान न देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील पुरेशा उसाचे उत्पादन होते. मात्र, साखर उत्पादकांकडून आपल्या कारखान्यांमध्ये उसाच्या गाळप प्रक्रिया क्षमता वाढविण्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे उत्पादनात घट आल्याची माहिती कृषी मंत्री प्रा. एडॉल्फ मकेंडा यांनी दिली. प्रा. मकेंडा यांनी डोडोमा येथे सातव्या कृषी उत्पादकांच्या संमेलनात बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, सरकार पुढील वर्षी स्थानिक उत्पादकांना साखर आयात करण्याची परवानगी देणार नाही. २०२२ पर्यंत देशांतर्गत स्थानिक वापरासाठी पुरेशी साखर उत्पादन करण्यात देश सक्षम होईल. सध्याच्या कारखान्यांच्या विस्तारीकरणासाठी नव्या उद्योगांच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत.
ते म्हणाले, टांझानिया दर वर्षी ४०,००० टनाहून अधिक साखरेची आयात करतो. एवढी साखर स्थानिक स्तरावर उत्पादन केली जाऊ शकते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्व उसाची खरेदी कारखान्यांनी करावी. त्यासाठी आपल्या कारखान्याच्या गाळप क्षमतेचा विस्तार करावा. प्रा. मकेंडा यांनी साखरेच्या अवैध आयातीविरोधात इशारा देताना सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. कारखान्यांच्या विस्तारीकरणानंतर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. टांझानियात देशांतर्गत साखरेची मागणी ४७,००० मेट्रिक टन आहे. तर देशातील पाच कारखान्यांची उत्पादन क्षमता २०१९ मध्ये ३,७८,००० टन होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link