दार एस सलाम : टांझानिया प्रधानमंत्री कार्यालयाच्या गुंतवणूक राज्य मंत्री अंगेला कैरुकी यांनी भारतीय गुंतवणूकदार पुरंदरे इंडस्ट्रीज (टी) लिमिटेड द्वारा देशाची राजधानी डोडोमा मध्ये चमिनो जिल्ह्यामध्ये साखर कारखाना सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भारत-टांझानिया व्यापार संबंध वाढत आहेत आणि साखर कारखान्याची स्थापना जुलै 2016 मध्ये भारतीय प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा झाल्यानंतर प्रोत्साहन दिलेल्या निर्णयापैकी एक आहे. मंत्री कैरुकी यांनी कारखान्याचा दौरा केला होता, जिथे त्यांनी कंपनीचे व्यवस्थापक सतीश पुरंदरे यांच्याकडून कारखान्याच्या निर्मितीबाबत माहिती घेतली. दौऱ्यानंतर कैरुकी यांनी सांगितले की, भारत अजूनही टांझानिया च्या प्रमुख व्यापार आणि गुंतवणूक भागीदारांपैकी एक आहे.
कंपनी चे व्यवस्थापक सतीश पुरंदरे यांच्या अनुसार, कारखान्यामध्ये प्रति वर्ष 5,000 टन साखर उत्पादन करण्याची क्षमता आहे, जून 2021 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. पुरंदरे यांनी सांगितले की, राष्ट्रपति जॉन मैगुफुली यांच्या नेतृत्वातील सरकार आम्हाला मोठे सहकार्य करत आहे. त्यांना आशा आहे की, ही गुंतवणूक चमिनो जिल्ह्यामध्ये आर्थिक क्षेत्राला अधिक चांंगले बनवण्याामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावेल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.