टांझानियात २०२४ पर्यंत वार्षिक ६,७०,००० टन साखर उत्पादनाची योजना

दार एस सलाम : टांझानियामध्ये साखरेचे वार्षिक उत्पादन ३,६७,००० टनावरुन वाढवून २०२४ पर्यंत ६,७२,००० टन करण्याची योजना तयार करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. सरकारचे मुख्य प्रवक्ते गर्सन मिसिगवा यांनी सांगितले की, देशातील प्रमुख साखर उद्योग असलेल्या कागेरा, माउंटिबवा आणि किलोम्बेरो यांच्याकडून २०२४ पर्यंत ३,०५,००० टन अधिक साखर उत्पादनाची योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत वार्षिक उत्पादन ६,७२,००० टन होईल.

साखर उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येणाऱ्या इतर उपायांमध्ये साखर कारखान्यांची स्थापना आणि उसाच्या मळ्यांचा विस्तार या बाबींचा समावेश आहे. देशात सद्यस्थितीत साखरेची वार्षिक मागणी ४,२०,००० टनाची आहे. मे २०२० मध्ये टांझानिया सरकारने साखरेची कमतरता दूर करण्यासाठी २५,००० टन साखर आयात केली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here