दार एस सलाम : यावर्षीच्या सुरुवातीला साखरेच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीनंतर पुन्हा साखरेच्या किमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. याबाबत कृषी मंत्री हुसैन बाशे यांनी गुरुवारी संसदेत सांगितले की, साखरेच्या वाढत्या किमतींना आळा घालण्याच्या सरकारच्या उपाययोजनांमध्ये राष्ट्रीय खाद्य रिझर्व्ह एजन्सी (एनएफआरए) ला साखर खरेदी करणे आणि साठवणुकीचे अधिकार देण्याचा समावेश आहे.
मंत्रालयाच्या २०२४-२५ मधील अर्थसंकल्पात १.२४९ ट्रिलियन डॉलरच्या बजेटला पाठिंबा देण्यासाठी संसदेला आवाहन करताना मंत्री बाशे म्हणाले की, एनएफआरएला नियंत्रित करण्यासाठी अर्थ अधिनियम २०२४ च्या माध्यमातून कायद्यात बदल केला जाईल. टांझानियात साखरेच्या तुटवड्यामुळे किंमतीमध्ये मोठी वाढ होते. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवणे हा यामागील उद्देश आहे.