दार एस सलाम: टांझानिया ने अलीकडेच अनेक कारणांमुळे साखरे मध्ये घट पाहिली आहे, ज्यामुळे ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. मोठ्या पावसाचा साखर उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, साखरेच्या किमतीत वाढ करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. काहींनी कृत्रिम घट आणण्यासाठी गोदामामध्ये साखर जमा करुन ठेवली आहे. कृषि मंत्री जैफेट हसुंगा यांनी सांगितले की, अनेक लोक सरकारकडून निर्धारीत केलेल्या मूल्यापेक्षा अधिक दराने साखर विकत आहेत, यामुळे ग्राहकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. हे लक्षात घेऊन ही कारवाई केली जात आहे.
हसुंगा यांनी सांगितले की, जे सरकारी किंमतींपेक्षा अधिक दराने साखर विकत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मंत्री म्हणाले की, जर कुणी अशा पद्धतीने गैर कारभार केला तर त्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार. हसुंगा यांनी सांगितले की, टांझानिया मध्ये साखरेची एक वर्षाची सरासरी मागणी 470,000 टन आहे, तर देशातील पाच साखर कारखान्यांंमध्ये 2019 मध्ये 378,000 टन उत्पादन झाले होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.