डोडोमा : टांझानियाने २०२५ पर्यंत आपल्या साखर उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्याच्या धोरणाअंतर्गत प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये किलोम्बेरो शुगर कंपनीने Sh 571.6 बिलियनच्या आपल्या विस्तार योजनेला मंजुरी दिली. या कंपनीत इलोवो शुगर आफ्रिकेची ७५ टक्के हिस्सेदारी असून उर्वरीत २५ टक्के हिस्सा टांझानिया सरकारचा आहे. या गुंतवणुकीबरोबरच कंपनीने उत्पादन दुप्पट करण्याची योजना तयार केली आहे. या विस्तार योजनेनंतर किलोम्बेरोचे वार्षिक साखर उत्पादन १,४४,००० टनावरून वाढून २,७१,००० टन होईल.
याबाबत इलोवो शुगर आफ्रिकाचे व्यवस्थापकीय संचालक गेविन डाल्गलिश यांनी सांगितले की, आम्ही स्थानिक मागणी पर्ण करण्यासाठी दरवर्षी देशात आयात केल्या जाणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी करण्याचे मुख्य ध्येय ठेवले आहे. टांझानियाच्या लोकांनी केलेल्या भागिदारीबाबत आम्ही खूप समाधानी आहोत. आमच्या अंदाजानुसार, साखरेची आयात कमी झाल्यास टांझानिया आपल्या पककीय चलनात ७१ मिलियन डॉलरची बचत करू शकेल. किलोम्बेरोला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७५०० वरून वाढून १४००० ते १६००० यादरम्यान होईल, अशी आमची अपेक्षा आहे.