ऋषिकेश : भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे सरकारने यंदा उसाच्या दरात वाढ केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य नफा मिळत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केली. शुक्रवारी डेहराडूनमधून हरिद्वारला जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री रावत हे डोईवालातील मांजरी ग्रँट मध्ये थांबले होते. तेथे त्यांनी शेतकर ताजेंद्र सिंह यांच्या शेतातील ऊसाचा आस्वाद घेतला.
लाईव्ह हिंदूस्थानने दिलेल्या वृत्तानुसार, माजी मुख्यमंत्री रावत म्हणाले की, शेतकरी यावर्षी उसाची दरवाढ होईल आणि त्यांच्या पिकाचा दर वाढेल अशा विचारात होते. मात्र, ऊस गोड असला तरी त्याची दरवाढ न करून सरकारने त्याचा स्वाद फिक्का केला आहे. जगात साखरेला मागणी वाढली आहे. दर सरकारने ऊस दर ४०० ते ४५० रुपये केला असता तर शेतकऱ्यांचे भले झाले असते. मात्र, साखर कारखानदारांचा फायदा करून देण्यासाठी ऊस दर वाढविण्यात आला नाही. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुशील राठी, ऊस समितीचे अध्यक्ष मनोज नौटियाल, मोहित उनियाल, गुरदिप सिंह, गुरजीत सिंह, ताजेंद्र सिंह, उम्मेद बोरा, गौरव मल्होत्रा आदी उपस्थित होते.