मुंबई : टाटा मोटर्सने BS६ टप्पा II श्रेणीतील प्रवासी वाहनांच्या RDE (रियल ड्रायव्हिंग एमिशन) आणि E२०-अनुरूप इंजनांतील बदल पूर्ण झाले असल्याची घोषणा केली आहे. एप्रिल २०२३ पासून लागू होणाऱ्या उत्सर्जन मानदंडांसाठीच्या नियमांपूर्वी टाटा मोटर्सने हे पाऊल उचलले आहे. नवे आरडीई अनुरुप इंजिन अधिक प्रतीक्रियाशील आहे आणि अधिक सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीने त्याचे ट्युनिंग करण्यात आल्याचा दावा टाटा मोटर्सने केला आहे.
Tata Motors च्या म्हणण्यानुसार, अल्ट्रोज हॅचबॅक आणि पंच कॉम्पॅक्ट SUV ची लो एन्ड ड्रायव्हब्लिटी अशा पद्धतीने वाढविली आहे की, ते खालच्या गिअरमध्ये अधिक स्मूथ अनुभव देतात. दोन्ही मॉडेल आपल्या सर्व व्हेरियंटमध्ये मानकाच्या रुपात आयडल स्टॉप-स्टार्टही देतील. यातून चांगले ऑन रोड मायलेज मिळेल. डिझेल इंजिनबाबत कंपनीने Altroz आणि Nexon कॉम्पॅक्ट SUV दोन्हींसाठी Revotorq डिझेल इंजिनला अपग्रेड केले आहे. याशिवाय, चांगल्या कामगिरीसाठी नेक्सन डिझेल इंजिन पुन्हा ट्युन करण्यात आले आहे.
Tata Motors ने Tiago हॅचबॅक आणि Tigor सेदानमध्ये TPMS जोडले आहे. संपूर्ण पीव्ही रेंजवर मानक वॉरंटी दोन वर्षे / ७५,००० किमीवरुन वाढवून तीन वर्षे /१,००,००० किमी केली आहे. Tata Motors च्या सर्व कार्स आता ई २० इंधन अनुकूल आहेत, जे २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल अशा मिश्रणावर चालू शकतील. भारत ऊर्जा सप्ताहादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल मिश्रणाच्या रोडमॅपवर ११ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तेल वितरण कंपन्यांच्या ८४ रिटेल आऊटलेट्सवर E२० लाँच केले आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्हाइस प्रेसिडेंट (सेल्स, मार्केटिंग अँड कस्टमर केअर) राजन अंबा यांच्या म्हणण्यानुसार, टाटा मोटर्स नेहमीच वाहनांतून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारच्या अभियानात सक्रिय सहभागी झाले आहे. आम्ही सातत्याने नव्या तंत्रज्ञानाच्या शोधात आहोत, जे उत्सर्जन नियंत्रणात राखतील. आम्ही आपल्या कार्स नव्या उत्सर्जन मानकांसह अपग्रेड करण्याची संधी मिळवली आहे. याशिवाय एक उच्च पोर्टफोलिओदेखील तयार केला आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक सुरक्षा, सुलभता, उच्च सुविधा, चांगल्या प्रवासाचा अनुभव मिळेल.