नवी दिल्ली : मागणी अभावी निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे ऑटोमोबाइल अर्थात वाहन क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. सरकारी उपाययोजनांमुळे हे वातावरण काहीसे निवळले असले तरी अद्यापही हे क्षेत्र संकटात असल्याचे टाटा समुहाने घेतलेल्या निर्णयावरुन स्पष्ट झाले आहे. टाटा नॅनोने वाहन क्षेत्राला धक्का दिला आहे.
उद्योपगती रतन टाटा यांच्या स्वप्नातील कार अशी ओळख असलेली ‘टाटा नॅनो’ लवकरच इतिहास जमा होणार आहे. पुढील वर्षापासून या कारचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. आता त्याची विक्रीही बंद केली जात आहे.
वाहन बनवणारी देशाची प्रमुख कंपनी टाटा मोटर्सने यावर्षी पहिल्या नऊ महिन्यात कमी किंमत असलेल्या नॅनो कारचे एकही उत्पादन केलेले नाही. कंपनीने फेब्रुवारीमध्ये केवळ एका कारची विक्री केली होती. टाटा मोटर्सने अधिकृतपणे या कारची विक्री बंद करण्याची कोणतीही घोषणा अद्याप केलेली नसली तरी वर्षभरात या कारचे उत्पादन बंद करण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांना परवडणारी कार अशी टाटा नॅनोची ओळख आहे. परंतु, 2019 मध्ये आतापर्यंत नॅनोच्या फक्त एका कारची विक्री झाली आहे. कार उत्पादनाची मागणी, आधी असलेल्या कार आणि नियोजित कारचे उत्पादन याबाबत कंपनीने काहीही स्पष्ट केलेले नाही. परंतु कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेनुसार, यावर्षी सप्टेंबरमध्ये स्थानिक बाजारात नॅनोचे उत्पादन आणि विक्री झाली नाही. लागोपाठ हा नववा महिना सुरू आहे. टाटा मोटर्सने गेल्या नऊ महिन्यापासून एकाही कारचे उत्पादन केलेले नाही. फेब्रुवारी मध्ये मात्र केवळ एका कारची विक्री झाल्याची माहिती कंपनीकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतर कंपनीकडून एकाही कारची विक्री करण्यात आलेली नाही, हे विशेष.
कंपनीने 2008 साली वाहनांच्या प्रदर्शनात नॅनो कारला पहिल्यांदा जनतेसमोर आणले होते. सर्वसामान्यांची कार अशी नॅनोची ओळख करण्यात आली. परंतु, त्यानंतर नॅनोच्या कारच्या विक्रीत घट झाली. गेल्यावर्षी जानेवारी-सप्टेंबर दरम्यान टाटा मोटर्सने स्थानिक बाजारात 297 कारचे उत्पादन केले होते. तर 299 कारची विक्री करण्यात आली होती. नॅनो कारचे उत्पादन हे एप्रिल 2020 मध्ये बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत कंपनीकडून मिळाले आहेत.
नॅनो कारचे उत्पादन आणि विक्री 2020 पासून बंद होणार आहे. रतन टाटा यांच्या स्वप्नातील कार अशी ओळख असलेली नॅनो कार च्या उत्पादनात भविष्यात कोणतीही गुंतवणूक कंपनी करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या कारचे उत्पादन 2020 पासून बंद होणार आहे. नॅनो कार 2009 पासून बाजारात उपलब्ध करण्यात आली होती. त्यावेळी या कारची किंमत केवळ एक लाख रुपये इतकी होती. नॅनो कार ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त कार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.