भारताच्या स्टील क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असणार्या टाटा स्टील ने आपल्या दक्षिण वेल्स न्यूपोटर्स शहरात असणारा कारखाना बंद करण्याची घोषणा केली. यामुळे ब्रिटेनमधील या कारखान्यातील तब्बल 400 लोकांच्या नोकर्या धोक्यात आल्या आहेत. याशिवाय, कंपनीने वोल्वरहैंपटन येथे असणार्या स्टील सर्व्हिस सेंटरलाही टाळे घालण्याचे सांगितल्यामुळे इथे देखील 26 लोकांची नोकरी जाण्याची संभावना आहे.
आपल्या जागतिक कोजेंट इलेक्ट्रिकल स्टील्स खंडाच्या अंतर्गत येणार्या कॅनडा आणि स्वीडन च्या संयंत्रांची विक्रीचा करार केले असल्याचे, टाटा स्टील ने सांगितले. सारे पर्याय शोधूनही, टाटा स्टील ओर्ब इलेक्ट्रीक स्टील्स संयंत्रासाठी कोणताही मार्ग काढू शकलेली नाही. ओर्ब इलेक्ट्रिकल स्टील्स चे मोंठे नुकसान होत असल्याचे, टाटा स्टील के यूरोपीय ऑपरेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक एडम यांनी सांगितले.
त्यांच्या मतानुसार, यूरोपीय स्टील उद्योग अनेक आव्हानांशी झगडत आहे आणि आगामी काळात ओर्बसाठी हा उद्योग फायदा घेवून येण्याची आशाही दिसत नाही. एडम म्हणाले, यामुळे नोकर्या धोक्यात आलेल्या लोकांसाठी ही बातमी वेदनादायी आहे. त्यांच्या सक्षमतेसाठी आमच्याकडून सर्व प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यूरोपातील आपली सहयोगी कंपनी कोजेंट पावर इंक (सीपीआई) च्या विक्रीसाठी जपानच्या स्टील क्षेत्रातील नामवंत कंपनी जेएफई शोजी ट्रेड कॉर्पोरेशनबरोबर करार केला असल्याचे, टाटा स्टीलने सांगितले. या यूनिटमध्ये जवळपास 300 लोक काम करत आहेत. सीपीआई, कोजेंट स्टील्सचा एक भाग आहे. टाटा स्टील ने 2018 च्या मे मध्ये याच्या विक्रीची घोषणा केली होती. टाटा स्टीलच्या अन्य युनिटसमध्ये जर्मनीची कालजिप, ब्रिटेनची फर्स्टस्टील, तुर्की ची टाटा स्टील, इस्तांबुल मेटल्स अणि ब्रिटेनची इंजिनिअरींग स्टील्स सर्व्हिस सेंटर आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.