अनाकापल्ली : थुम्मापाला साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले गेले नाहीत, तर आयटी मंत्री गुडिवाडा अमरनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे प्रतिपादन टीडीपी अनाकापल्ली मतदारसंघाचे प्रभारी आणि माजी आमदार पिला पीला गोविंदा सत्यनारायण यांनी मागणी केली. बुधवारी अनकापल्ली टाउन रिंग रोड जंक्शनवरील आरडीओ कार्यालयापर्यंत साखर कारखाना पुन्हा सुरू करावा आणि काळ्या गुळावरील निर्बंध हटविण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. या मोर्चावेळी बोलताना माजी आमदार पिला गोविंदा सत्यनारायण यांनी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याकडे निवडणूक प्रचारावेळी अनाकापल्ली येथील साखर कारखान्याबाबत दिलेल्या आश्वासनाबाबत विचारणा केली.
त्यांनी सांगितले की, आयटी मंत्री आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी कमीशनवर अधिक भर देत आहेत. काळ्या गुळाच्या आडून अबकारी विभागाचे अधिकारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. पिला गोविंदा सत्यनारायण यांनी जोरदार टीका करताना सांगितले की, आयटी मंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळे १३,००० ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रोजी-रोटी हिरावली गेली आहे. यासोबतच त्यांनी मंत्र्यांना आव्हान दिले की, ते अनाकापल्ली निवडणूक क्षेत्राच्या विकासाबाबत सार्वजनिक चर्चेस तयार राहावे. रॅलीनंतर टीडीपीच्या नेत्यांनी आरडीओ कार्यालयात निवेदन दिले. यावेळी के. बालाजी, एम. निला बाबू, मल्ला सुरेंद्र, के. मुरली, एमपीटीसी विजय आणि इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.