फैसलाबाद : कोरोना महामारीवेळी भ्रष्टाचार करणार्यांच्या विरोधात पाकिस्तानात पोलीसांनी कारवाई सुरु केली आहे. पाक येथील फैसलाबाद स्थित तहसील प्रशासनाने गेल्या शुक्रवारी येथील एका गोदामावर छापा टाकून 938 पोती तांदूळ आणि 635 पोती साखर जप्त केले.
अधिकार्यांनी सांगितल्यानुसार, भ्रष्टाचार्यांचा हेतू सध्याच्या महामारीमध्ये ही पोती बाजारात विकून फायदा मिळवायचा होता.
तहसील प्रशासन च्या असिस्टंट कमिश्नर समुद्री फैसल सुल्तान यांनी पोलीस टीमसह इथे छापा टाकून तांदूळ, साखरेने भरलेल्या पोत्यांना आपल्या ताब्यात घेतले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या या वस्तूंना खुल्या बजारात सरकारी दरामध्ये विकले जाईल. भ्रष्टाचारांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पाकिस्तानामध्ये साखरेची कमतरता आहे, यानंतर देशात साखरेचे दर आकाशाला गवसणी घालत होते. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार्यां विरोधात सरकारने कारवाई केली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.