खम्मम : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अलिकडेच काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना प्रती एकर १०,००० रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पाहणीसाठी व्यक्तीगतरित्या नुकसानग्रस्त भागांचा दौरा करणाऱ्या राव यांनी केंद्र सरकार पूर्वी पाठविण्यात आलेल्या अहवालांप्रती असलेल्या उदासिन भूमिकेमुळे केंद्राला आता कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर करण्यास नकार दिला. त्यांनी दावा केला की मदत आणि पुनर्वसन उपाय योजनांचा भाग म्हणून भारतात पहिल्यांदाच तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना प्रती एकर १०,००० रुपये मदत प्रदान करीत आहे. यासाठीचे २२८ कोटी रुपये त्वरीत दिले जातील.
खम्मम जिल्ह्यातील रामपूरम गावात केसीआर म्हणाले की, जोरदार वारे आणि पावसामुळे २,२८,२५० एकरातील पिकांचे नुकसान झाले होते. यापैकी १,२९,४४६ एकरात जादा नुकसान मक्क्याचे झाले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, आम्हाला जादा पैसे मिळणार नाहीत. मुख्यमंत्री राव यांनी पुढे सांगितले की, आम्ही निषेध म्हणून केंद्र सरकारला कोणताही अहवाल न पाठविण्याची भूमिका घेतली आहे. कारण, यापूर्वी पाठविण्यात आलेल्या अहवालांच्या आधारावर काहीच मदत देण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारवर अवलंबून राहू इच्छित नाही. कारण, त्यांना उत्तर देण्यास सहा महिने लागतात. सध्याचे केंद्र सरकार प्रचंड वाईट आहे. त्यांना राजकारणाशिवाय काहीच माहीत नाही. आणि ते लोकांची काळजीही करीत नाहीत.