तेलंगणा: निजाम साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

हैदराबाद : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी निजामबाद सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तेलंगणा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. विधानसभेसमोर आंदोलन करणाऱ्या अनेक शेतकरी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राज्यातील ऊस उत्पादक गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी करीत आहेत. अलिकडेच राज्याचा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाला. मात्र, त्यामध्ये कारखाना पुन्हा सुरू करण्याविषयी कोणतीची भूमिका सरकारने मांडली नाही. तत्पूर्वी मार्च महिन्यात एनसीएसएफ सुरक्षा समिती, भारतीय किसान संघ (बीकेसी) यांसह अनेक संघटनांच्या शेतकरी नेत्यांनी निजामाबाद जिल्ह्यातील थुरमनपल्ली गावापासून पदयात्रा सुरू केली होती. निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी विधानसभेपासून दूर वाहनांमध्ये ठेवले. अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
राज्य सरकारने हा कारखाना सुरू करावा अथवा तो किसान उत्पादक संघटनेकडे (एफपीओ) सोपवावा अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पदयात्रेत आठ विभागांतील ९० गावांशी संपर्क करून १२ एप्रिल रोजी निजामाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here