जहिराबाद : या हंगामात ट्रायडेंट शुगर्सकडून उसाचे लवकर गाळप सुरू करण्याची मागणी करत २००० हून अधिक शेतकऱ्यांनी जहीराबाद महसूल विभाग मुख्यालयात रॅली काढून धरणे आंदोलन केले.
द हिंदू डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कोट्टूर स्थित ट्रायडेंट शुगर्स गेल्या काही वर्शांपासून बंद होती. गेल्या हंगामात उसाचे गाळप पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कारखान्यावर एका वर्षापासून अधिक काळ शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.
कारखाना प्रशासनाने अर्थ मंत्री हरीश राव आणि जिल्हाधिकारी हनुमंत राव यांच्या हस्तक्षेपानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपले पैसे दिले होते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना ऊस बाहेर विक्री करावा लागला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती की यावर्षी कारखाना लवकरच गाळप सुरू करेल. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, ट्रायडेंट शुगर्सने या वर्षी लवकर उसाचे गाळप सुरू करावे अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठीची तयारी अद्याप झालेली नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link