हैदराबाद : तेलंगणा साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांचे २०१८- १९ या गाळप हंगामातील १२० कोटी रुपयांचे थकबाकी असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. राज्यातील शेतकरी संघटनांचा असा दावा आहे की राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अत्यंत भयावह स्थितीत असून त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे.
ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी असा दावा केला की, साखरेच्या किंमती “उदासीन” असल्यामुळे ही स्थिती आहे. सन २०१७ – २०१८ आणि २०१८- २०१९ या हंगामात अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेला चांगला भाव मिळत नाही. यामुळे साखर कारखान्यांच्या लिक्विडिटीवर विपरीत परिणाम झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस दराची थकबाकी वाढली,”
तेलंगणा कन्सोर्टियम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन्स (सीआयएफए) चे अध्यक्ष के सोमशेखर राव म्हणाले, “भाजपा सरकार उसाची आधारभूत किमतीत किमान वाढ करीत नाही. ते प्रति टन 3,750 रुपये असायला पाहिजे. महागाईमुळे राज्यातील शेतकर्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.”
केवळ राज्यातील च ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत, असे नाही तर बिहार, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकरीदेखील अडचणीत आहेत. यामध्ये सर्वात जास्त फटका उत्तर प्रदेशात बसला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.