हॅम्बर्ग : इजिप्तच्या डेल्टा शुगर कंपनीने १,६०,००० टन कच्ची साखर खरेदी करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय निविदा जारी केली आहे अशी माहिती युरोपियन व्यापाऱ्यांनी दिली. निविदेसाठी प्रस्ताव जमा करण्याची मुदत ११ डिसेंबर असल्याची माहिती या व्यापाऱ्यांनी दिली. तर ही ऑफर १३ डिसेंबरपर्यंत वैध राहणार आहे.
यासंदर्भात रॉयटर्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार ५०,००० टनाचा पहिला लॉट आणि ३०,००० टनाचा एक लॉट जानेवारी २०२२ पर्यंत देणे गरजेचे आहे. तर फेब्रुवारी २०२२ च्या पहिल्या सहामाहीत ५०,००० टन आणि ३०,००० टनाचा एक लॉट देणे अपेक्षित आहे.