धाराशिव जिल्ह्यात तेरणा साखर कारखान्याने उसाला दिला सर्वाधिक दर : कार्यकारी संचालक केशव सावंत

धाराशिव : येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ या हंगामातील उसाला जिल्ह्यात सर्वाधिक २,८२५ रुपये प्रती टन दर दिला आहे. जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर्सच्या युनिट क्रमांक सहाच्यावतीने या कारखान्याचे व्यवस्थापन चालवले जाते. गेल्यावर्षी, कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सावंत यांनी या दराची घोषणा केली होती. तेरणा कारखान्याने गळीत हंगामातील २० नोव्हेंबर ते २० मार्च २०२३ याकाळात तब्बल ३,१२,८७८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या उसाचे बिलही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांनी ही माहिती दिली.

ढोकी येथील तेरणा कारखाना गेल्या बारा वर्षांपासून बंद होता. हा कारखाना सुरू व्हावा, यासाठी परिसरातील शेतकरी, कारखान्याचे सभासद, व्यापारी, कामगारांनी तेरणा संघर्ष समिती स्थापन करून कोरोना काळात आंदोलने केली. त्यानंतर बँक प्रशासनाने कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी भैरवनाथ शुगर्सकडे २५ वर्षे भाडेतत्त्वावर हा कारखाना चालविण्यास घेतला. कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांनी सहा महिन्यांत कारखान्याचे काम पूर्ण करून कारखाना सुरू केला.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचणे सुरू ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here