पाकिस्तान : सोमवारी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज वर दहशतवाद्यांचा हल्ला होऊन यामध्ये दोन लोक मारले गेले. हल्ल्याची सूचना मिळताच पाकिस्तान रेंजर्स च्या जवानांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
सुरक्षा बलांनी बिल्डिंग च्या आसपास चा परिसर सील केला. तसेच जवळच्या च्या बिल्डिंगवर स्नाइपर्स तैनात केले. मृत्यू झालेल्या दहशदवाद्यांजवळ हत्यार आणि दारु गोळा जप्त केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलीस म्हणाले, चार पैकी तीन दहशतवादी मारले गेले, तर एक जण इमारतीच्या आत बंद आहे. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज चे डायरेक्टर अबीद अली हबीब म्हणाले, स्टॉक एक्सचेंज मध्ये मोठी दुर्भाग्यपूर्ण घटना घडली आहे. दहशतवादी पार्किंग एरियामधून घुसले होते आणि सर्व लोकांवर फायरिंग करत होते. दहशतवाध्यानी रेलवे ग्राउंड पार्किंग क्षेत्रामध्ये घुसून स्टॉक एक्सचेंज च्या मैदानाच्या बाहेर गोळीबार केला होता.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.