बँकॉक : थायलंडच्या उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोविड १९ संक्रमणाच्या नव्या लाटेमुळे व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात थायलंडमधील उत्पादनात २.४४ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. डिसेंबर महिन्यातील उत्पादन सूचकांक (एमपीआय) पेट्रोलियम, साखर आणि रबरच्या कमी उत्पादनामुळे घसरला आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स, कार आणि टायरच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
मंत्रालयातील अधिकारी थोंगचाई चवलीपटिचेट यांनी सांगितले की, राष्ट्रीय उत्पादन सूचकांक (एमपीआय) जानेवारी महिन्यात सकारातमक राहील. कारण सकराच्यावतीने कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि निर्यातीत सुधारणेची शक्यता आहे.