थायलंड सरकारने साखरेवरील कर वाढवला आहेे . वाढीव करवाढ १ ऑक्टोबर पासून अमलात येणार असून आता थायलंडमध्ये खााद्य पेयांचे दर वाढणार. अबकारी कर कायदा २०१ अन्वये साखरयुक्त पेयांवर अधिक दराने कर आकारला जाणार आहे .
सरकारने हा साखर कर वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे आणि अहवालानुसार तिसरी करवाढ 1 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. तसेच साखर करात वाढ झाल्याने त्याचा साखर वापरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
उत्पादनाच्या 100 मिलीलीटर 10 ग्रॅम साखर असलेल्या साखर पेयावर कर आकारला जाणार नाही. परंतु 10-14 ग्रॅम श्रेणीतील पेयांवर प्रतिलिटर 1 baht कर आकारला जाईल, तर 14 ते 18 ग्रॅम वर- 3 baht प्रति लीटर आणि 18 ग्रम पेक्षा अधिक साखर पेयांवर 100 मिली – 5 baht प्रति लिटर कर आकारण्यात येईल .
युनायटेड किंगडम, फ्रान्स, आयर्लंड, सौदी अरेबिया, पोर्तुगाल आणि अमेरिकेच्या काही राज्यांसारख्या बर्याच देशांनी गेल्या काही वर्षांत साखर युक्त पेयांवर कर लावला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.