थायलंड: २०२१-२२ च्या हंगामात ऊस उत्पादन वाढीची शक्यता

न्यूयॉर्क : साखर व्यावसायिक आणि पुरवठादार संस्था जार्निकोने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ऊसाला साखर कारखान्यांतर्फे चांगला दर मिळत असल्याने ऊस लागवडीला प्रोत्साहन मिळाले आहे. परिणामी 2021-2022 या हंगामात थायलंडमध्ये ऊस उत्पादनात वाढण्याची अपेक्षा आहे.

जार्निकोच्या अहवालात म्हटले आहे की ऊसाचे उत्पादन २०२१-२२ या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) ३० मिलीयन टनावरून १०० मिलीयन टनावर पोहोचण्याची शक्यता आहे.

सध्या थायलंडमध्ये २०२०-२१ या हंगामात गाळप सुरू असून ते गेल्या १० वर्षात सर्वात कमी आहे. उसाला मिळणारा कमी दर आणि खराब हवामान यामुळे सलग दोन हंगामात ऊसाची लागवड खालावली आहे. या अहवालानुसार साखर कारखाने सध्या शेतकऱ्यांकडून खरेदी करत असलेल्या ऊसाला उच्चांकी दर देत आहेत. शेतकऱ्यांना सध्या ऊसाला हेक्टरी ८६० डॉलर दर मिळत आहे. जार्निकोने म्हटले आहे की, थायलंडमधील वातावरणातही बदल झाला असून फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात पाऊस नेहमीपेक्षा २० टक्के अधिक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात भर पडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here