बॅंकॉक : थायलंडने २०२२ मध्ये ७६.९ लाख टन तांदळाची निर्यात केली आहे अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली. एक वर्षाच्या तुलनेत ही निर्यात २२.१ टक्के अधिक आहे. एकूण ७.५ मिलियन टनाच्या उद्दिष्टापेक्षा ही निर्यात अधिक झाली आहे.
थायलंडने इराक, दक्षिण आफ्रिका, चीन आणि अमेरिकेला सर्वाधिक निर्यात केली आहे. वरिष्ठ वाणिज्य अधिकारी रोन्नारॉग फुलपिपत यांनी सांगितले की, थायलंडची तांदूळ निर्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. सरासरी ३८ baht वर व्यवसाय झाला आहे. थायलंड हा भारत आणि व्हिएतनामनंतरचा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला थायलंडने २०२३ मधील आपले निर्यात उद्दिष्ट ८ मिलियन टनावरुन ७.५ मिलियन केले आहे.