थायलंडमध्ये खरेदीदार शोधण्यासाठी साखर व्यापारी करत आहेत संघर्ष

थायलंडचा साखर उद्योग अतिरिक्त साखर साठयामुळे त्रस्त आहे. हा साठा कमी करण्यासाठी ते हर एक प्रयत्न करत आहेत. देशात २o१८-१९ च्या हंगामात साखर उत्पादनात प्रमाणापेक्षा अधिक वाढ झाली. अहवालानुसार, साखरेची मागणी कमी झाली आहे आणि यासाठी थायलंड मध्ये साखर व्यापाऱ्यांचा खरेदीदार शोधण्यासाठी संघर्ष सुरु आहे.
सुरुवातीला हा अंदाज वर्तवण्यात आला होता की, ऊसाचे उत्पादन ११५ मिलियन हून १२० मिलियन मेट्रीक टन होईल, पण आतापर्यंत हे २०१८-१९ या हंगामात १३१ मिलीयन मेट्रीक टनापर्यंत पोचले आहे. थाई शुगर मिलर्स कॉर्पोरेशन च्या अंदाजानुसार, जानेवारी -जून मध्ये थाई साखरेचे प्रमुख खरेदीदार म्यानमार आणि कंबोडिया या देशांनी रिफाइंड साखर आयातीमध्ये क्रमश: १२०,०४६ मिलियन टन आणि २८४,३८७ मिलियन टनामध्ये मोठी घसरण नोंदवली, जी संपूर्ण वर्षात ६६ टक्के आणि ३२ टक्के कमी राहिली. पांढरी आणि रिफाइंड थाई साखरेच्या आयातीची मागणी २०१९ मध्ये कमी झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here