ढ़ाका: कोरोनाचा परिणाम भारतीय साखर उद्योगासह आता इतरही साखर उत्पादक देशांवर होत आहे. बांग्लादेशा मध्ये कोरोनाने साखर उद्योग उध्वस्त केला आहे. देशातील साखर कारखान्यां मध्ये ही साखर विकली जात नाही त्यामुळे राजस्व बाबत अडचणी येत आहेत, शिवाय साखर कारखाने ऊस शेतकरी आणि कर्मचारी यांचा पगारही भागवू शकत नाहीत.
बांग्लादेश च्या ठाकुरगांव साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाला इशारा दिला आहे की, जर त्यांना तीन महिन्याचा पगार आणि मजुरांना मजुरी दिली गेली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. साखर कारखान्याच्या परिसरात रविवारी भरदुपारी १ वाजता कर्मचाऱ्यांनी ठाकुरगाँव शुगर मिल वर्कर्स एंड एम्पलाइज यूनियन यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळीचे आयोजन केले.
कर्मचाऱ्यांनी सांगितले की , जर कारखान्याच्या व्यवस्थापकांनी पीडित श्रमिक आणि कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि मजुरी लवकरात लवकर दिली नाही तर तिव्र आंदोलन करु. ठाकुरगाँव शुगर मिल्स वर्कर्स एंड इम्प्लॉइज यूनियन चे अध्यक्ष एमडी उज़ल हुसैन आणि महासचिव एनीत अली आयोजित मानवी साखळी कार्यक्रमात उपस्थित कर्मचारी आणि श्रमिकांना संबोधित केले.
ठाकुरगाँव शुगर मिल चे प्रमुख निदेशक शाखावत हुसेन यांनी सांगितले की, श्रमिक आणि कर्मचारी यांची उर्वरीत थकबाकी लवकरात लवकर भागवण्याचा प्रयत्न करु.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.