शामली, उत्तर प्रदेश: साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु करण्याची तारीख घोषित केली आहे. थानाभवन आणि ऊन साखर कारखान्यामध्ये एक नोव्हेंबर आणि शामली साखर कारखान्यामध्ये दोन नोव्हेंबर ला गाळप सुरु होईल. तीन कारखान्यांच्या खरेदी केंद्रांवर ऊस खरेदी 30 ऑक्टोबर पासून सुरु होईल.
अपर दोआब साखर कारखाना शामली चे ऊस महाव्यवस्थापक डॉ. कुलदीप पिलानिया यांनी सांगितले की, गाळप हंगामाबाबत तयारी करण्यात आली आहे. दोन नोव्हेंबर पासून गाळपाचा शुभारंभ होईल. यापूर्वी 30 ऑक्टोबरपासून खरेदी केंद्रांवर खरेदी होवू लागेल आणि इंडेंट 28 ऑक्टोबरलाच पाठवला जाईल.
थानाभवन साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक जेबी तोमर यांनी सांगितले की, 28 ऑक्टोबर ला इंडेंट सहकारी ऊस विकास समितीला पाठवण्यात येईल आणि 30 ऑक्टोबर पासून खरेदी केंद्रांवर खरेदीं होईल. तर ऊन साखर कारखानाही एक नव्हेंबरपासून सुरु होईल. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादुर सिंह यानीं सांगितले की, जिल्ह्यामध्ये शामली, थानाभवन, ऊन ऊस समितीमध्ये सट्टा प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जितक्या तक्रारी आल्या होत्या, त्यांचे निराकरण जवळपास झाले आहे. विभागीय पोर्टल वर डाटा फीड केला जात आहे. लवकरच शेतकर्यांना कॅलेंडर वितरित केले जातील. शेतकर्यांना यावेळी कागदाची पावती मिळणार नाही, तर पावतीचा एसएमएस नोंदणीकृत मोबाइल नंबर वर पाठवला जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.