“ऊस शेतकर्‍यांची सात करोडची थकबाकी जिल्हा ऊस अधिकार्‍यांनी 24 तासांच्या आत करावी”

संभल: मझावली स्थित वीनस साखर कारखान्याकडून गेल्या गाळप हंगामातील ऊसाची सात करोड रुपयाची थकबाकी अजूनही भागवलेली नाही. शेतकर्‍यांनी पैसे न मिळाल्याचा मुद्दा मंगळवारी नोडल अधिकारी यांना सांगितला. यावर नोडल अधिकार्‍यांनी जिल्हा ऊस अधिकार्‍यांना सांगितले की, 24 तासाच्या आत वीनस साखर कारखान्याची थकबाकी भागवावी.

प्रदेश सरकारचे नोडल अधिकारी वीराम शास्त्री यांनी मंगळवारी दुपारी मोहम्मदपूर टांडा स्थित ऊस क्रय केंद्राचे निरीक्षण केले. त्यांनी वजन काटा चेक केला. उपस्थित शेतकर्‍यांची संवाद साधला. यावेंळी शेतकरी सुदेश कुमार यांनी सांगितले की, 14 दिवसांमध्ये ऊसाचे पैसे भागवण्याचा नियम आहे, पण वीनस कारखाना मझावली ने आतापर्यंत गेल्या वर्षाचे पैसे दिलेले नाहीत. जिल्हा ऊस अधिकारी कुलदीप सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्यावर गेल्या गाळप हंगामाचे 7 करोड रुपये देय आहे. यावर जिल्हा ऊस अधिक़ार्‍यांनी त्यांना सांगितले की, कारखान्याबरोबर त्यांची चर्चा सुरु आहे. आणि कारखान्याच्या अधिकार्‍यांनी बुधवारी पैसे देण्याबाबत सांगितले. यावर नोडल अधिकार्‍यांनी सांगितले की, साखर कारखान्याने 24 तासाच्या आत ऊस थकबाकी भागवावी.

25 एप्रिल पासून पैसे मिळण्याच्या प्रतिक्षेत येथील शेतकरी होते. मझावली स्थित वीनस साखर कारखान्याचा गाळप हंगाम 25 एप्रिलपासून संपला होता. शेतकर्‍यांना सर्व पैसे 10 एप्रिल पर्यत देणे आवश्यक होते. कारण ऊस क्रय केल्यानंतर 14 दिवसांच्या कालावधीत पैसे देण्याचा नियम आहे. पण या नियमाचे पालन केले गेले नाही. याबाबत नोडल अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली. यावर त्यांनी 24 तासांमध्ये पैसे भागवण्यचा आदेश दिला पण व्याजाच्या प्रश्‍नावर कोणताही आदेश दिलेला नाही. जेव्हा जिल्हा ऊस अधिकार्‍यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, पहिल्यांदा पैसे भागवावेत त्यानंतर व्याजाबद्दल बोलावे.

नोडल अधिकार्‍यांनी 24 तासात पैसे भागवण्याचा आदेश दिला. याचे पालन करुन बुधवारी पैसे भागवले जातील, असे जिल्हा ऊस अधिकारी कुलदीप सिंह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here