रुडकी: उत्तम साखर कारखान्याकडून गाळप हंगाम 2019-20 मध्ये शेतकर्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या उसाचे 16 दिवसांचे पैसे भागवण्यात आले आहे. करोड चा चेक साखर कारखाना प्रशासनाकडून उस समितीकडे सुपुर्द केला आहे. लवकरच ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल.
बुधवारी उत्तम साखर कारखान्याकडून गाळप हंगाम 2019-20 चे शेतकर्यांचे पैसे देण्यात आले आहेत. साखर कारखाना प्रशासनाकडून 7 नोंव्हेंबर ते 22 नोव्हेंबरपर्यंत 16 दिवसांची थकबाकी समितीकडे देण्यात आले आहे. साखर कारखाना प्रशासनाने सांगितले आहे की, शेतकर्यांचे पैसे वेळेत व्हावे यासाठी साखर कारखाना सातत्याने प्रयत्न करत आहे. बुधवारी उत्तम साखर कारखान्याचे केन मैनेजर अनिल सिंह समितीकडे चेक घेवून पोचले जिथे त्यांनी लिब्बरहेडी उस विकास समितीला 11 करोड पेक्षा जास्तीचा चेक सोपवला. यामध्ये सांगितले की, हे एकूण 16 दिवसांची थकबाकी आहे. यावेळी समिती सभापती चे प्रतिनिधी तसेच समिती डायरेक्टर सुशील राठी शिवाय समिती सचिव जय सिंह आदी उपस्थित होते. समिती सचिव जय सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून मिळालेली थकबाकीची रक्कम लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जाईल.