कारखान्यांनी लक्ष्याप्रमाणे भागवली थकबाकी

बिजनौर : डीएम रमाकांत पांड्ये यांच्या साखर कारखान्याच्या ऊस थकबाकीच्या सूचनांचा साखर कारखान्यांवर मोठा परिणाम झाला आहे. कारखान्यांनी यावेळी लक्ष्यप्रमाणे थकबाकी भागवली आहे. चांदपुर साखर कारखान्याकडून कोणतीही थकबाकी भागवण्यात आली नाही, तरीही कारखान्यांनी चांगल्या प्रकारे पैसे भागवले आहेत. या आठवड्यासाठी ही कारखान्यांना लक्ष्य देण्यात आले आहे.

साखर कारखान्यांना प्रत्येक आठवड्यात डीएम यांच्याकडून ऊस थकबाकी भागवण्याचे लक्ष्य दिले जात आहे. डीएम कडून याची समिक्षा केली जात आहे आणि साखर कारखान्यांवर सक्तीही केली जात आहे. गेल्या आठवड्यात कारखान्यांना 70 करोड रुपये भागवण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. याच्या सापेक्ष कारखान्यांनी 69.56 करोड रुपये दिले आहेत. धामपुर कारखान्याने 20 करोड च्या तुलनेत 22.21 करोड, स्योहारा कारखान्याने दहाच्या तुलनेत 10.92 करोड, बिलाई ने दहाच्या तुलनेत 12.41 करोड, बहादरपूर ने पाच च्या तुलनेत 5.13 करोड, बरकातपूर कारखान्याने दहाच्या तुलनेत 10.20 करोड, बुंदकी कारखान्याने पाच च्या तुलनेत 5.45 करोड तथा बिजनौर साखर कारखान्याने पाचच्या तुलनेत 3.21 करोड रुपये भागवले आहेत. चांदपुर कारखन्याने एका रुपयाचीही थकबाकी भागवली नाही. डीएम यांनी कारखान्यांच्या अधिक़ार्‍यांना फटकारुन लक्ष्य नुसार थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले. डीसीओ यशपाल सिंह यांनी सांगितले की, कारखान्यांकडून शंभर टक्के थकबाकी भागवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. चालू आठवड्यात 100 टक्के पैसे देण्याबाबत सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here