किच्छा, उत्तराखंड: साखर कारखान्यात बॉयलर चा दरवाजा पडल्याने साखऱ उत्पादन ठप्प झाले. साखर कारखान्यातील गाळप बंद झाल्याने कारखाना गेटवर ऊसाने भरलेल्या वाहनांची रांग लागली. साखर कारखाना व्यवस्थापनाने सांगितले की, 24 तासाच्या आत या दरवाजाची दुरुस्ती करुन गाळप सुरु करावे.
शुक्रवारी सकाळी अचानक तांत्रिक खराबी आल्याने साखर कारखान्याच्या बॉयलर चा दरवाजा पडला. ज्यानंतर ऊसाचे गाळप थांबवावे लागले. साखर कारखाना गेटवर उसाने भरलेल्या वाहनांची मोठी रांग लागली. ज्यानंतर शेतकर्यांमध्ये संताप पसरला. शेतकर्यांनी आरोप केला की, सतत कारखान्यामध्ये खराबी येण्यामुळे त्यांना ऊस सोंलण्यामध्ये विलंब होत आहे. ज्यामुळे दुसर्या पिकाच्या लावगडीमध्ये उशिर होत आहे. साखर कारखान्याचे अधिशासी निदेेशक रुचि मोहन रयाल यांनी सांगितले की, 24 तासाच्या आत बॉयलर ची दुरुस्ती करुन ऊसाचे गाळप सुरु केले जाईल. आतापर्यंत साखर कारखान्यात 7.40 लाख क्विंटल ऊसाचे गाळप झाले आहे. त्यांनी शेतकर्यांना विश्वास दिला की, साखर कारखाना आपले लक्ष्य वेळेत पूर्ण करेल.