पुणे: भारत सरकारने 2018साली एक महत्त्वकांक्षी नवीन जैवइंधन धोरण आखले आहे. परंपरागत सी हेवी मळी पासून, थेट उसाच्या रसापासून, मका/ तांदूळ या सारख्या या सारख्या निकृष्ट अन्नधान्यापासून, साखरेच्या पाका पासून इथेनॉल निर्मिती करून २०२५ साला पर्यंत पेट्रोल मध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट आहे.
हे नवीन जैवइंधन धोरण साखर उद्योगाचे अस्तित्व टिकवून ऊर्जितावस्था देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. नजीकच्या भविष्यकाळात 30 लाख शेतकरी, 20 लाख ऊस उत्पादक सभासद, लाखो कामगार बांधव 180 साखर कारखान्यांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष याचा परिणाम होणार आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाबाबत त्याच्या अवलंब बजावणीबाबत व एकूणच प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.
नवीन जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी कशी होणार? बी हेवी मळी व थेट उसापासून उत्पादन केल्यामुळे साखर उतारा घटतो का?
या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळणार आहेत. यातून शेतकऱ्यांच्या मनातील अनेक शंकांचे समाधान होणार आहे.
हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून “साखर उद्योगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम” या पुस्तकाचे मा. शेखर गायकवाड साहेब साखर आयुक्त व सहसंचालक, साखर मा. मंगेश तिटकारे लिखित पुस्तिकेचे प्रकाशन वसंतदादा साखर संशोधन संस्थेत आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळेस मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सहकारमंत्री मा. बाळासाहेब पाटील साहेब,जलसंपदा मंत्री मा. जयंतराव पाटील साहेब, गृहमंत्री मा. दिलीपराव वळसे पाटील सा.व इतर सन्माननीय गव्हर्निंग कौन्सिल सदस्य उपस्थित होते.
सदरचे हे पुस्तक साखर संकुल, पुणे येथे विक्रीसाठी उपलब्ध असून अधिक माहिती साठी 020 2553 5441 या नंबर वरती संपर्क साधावा.