नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने डिसेंबर २०२४ साठी २२ लाख मेट्रिक टन (LMT)चा मासिक साखर विक्री कोटा वाटप केला आहे. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये वाटप केलेल्या प्रमाणापेक्षा हा कोटा कमी आहे.
डिसेंबर 2023 मध्ये, सरकारने देशांतर्गत विक्रीसाठी २४ एलएमटीचा मासिक साखर कोटा निश्चित केला होता. नोव्हेंबर २०२४ साठी, सरकारने साखरेचा २२ एलएमटी असाच कोटा दिला होता. बाजारातील जाणकारांच्या मते, साखरेचे दर स्थिर राहण्यासाठी सरकार पावले उचलत आहे, मात्र साखरेच्या नव्या हंगामामुळे साखरेचे दर घसरण्याची शक्यता आहे.