केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणाऱ्या आगामी गाळप हंगामात ऊस दरामध्ये (एफआरपी) पाच रुपयांची वाढ करून प्रती क्विंटल २९० रुपये एफआरपी करण्याचा निर्णय २५ ऑगस्ट रोजी जाहीर केला.
आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत ऑक्टोबर २०२१- सप्टेंबर २०२२ या गळीत हंगामात ऊसाचा योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारने गळीत हंगाम २०२१-२२ साठी उसाची एफआरपी २९० रुपये प्रती क्विंटल निश्चित केली आहे. सरकारने सांगितले की, बेसिक १० टक्के साखर उताऱ्यासाठी २९० रुपये प्रती क्विंटल एफआरपी निश्चित करण्यात आली आहे.
यापूर्वी गेल्या गळीत हंगामात एफआरपीमध्ये १० रुपयांची वाढ करून ती २८५ रुपये करण्यात आली होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून ऊस दरात वाढ करण्याची मागणी केली होती.