नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रीमंडळाने गुरुवारी इथेनॉल च्या किमतीमध्ये वाढ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट च्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय साखर कारखाने आणि ऊस शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, इथेनॉलच्या किंमतीमध्ये 5 ते 8 टक्के वाढ करण्यात आली आहे. साखरेपासून बनवण्यात येणार्या इथेनॉलची किंमत 62.65 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. तर बी-हेवी मोलॅसिस पासून बनवण्यात येणाऱ्या इथेनॉल ची किंमत 57.61 रुपये आणि सी-हेवी मोलॅसिस पासून बनणार्या इथेनॉलची किंमत 45.69 प्रति लीटर करण्यात आली आहे.
त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे साखर कारखान्यांना लाभ होईल आणि ऊस थकबाकी भागवण्यातही मदत होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.