कोलकाता : केंद्र सरकार २०२५ पर्यंत पेट्रोल आणि डिझेलसोबत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस तथा शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी व्यक्त केला. सद्यस्थितीत देशात ९ टक्के इथेनॉल मिश्रण करण्यात येत आहे. पुरी हे आयसीसीच्या यंग लीडर्स फोरममधील एका चर्चासत्रात बोलत होते.
पुरी म्हणाले, देशातील ऊर्जा सुरक्षेसाठी इथेनॉल मिश्रणाचे धोरण पुढे राबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतात जवळपास ८५ टक्के तरल हायड्रोकार्बन आयात केले जाते. १२ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च यासाठी होतो. आम्ही गॅसचीही आयात करतो. त्यामुळे आमचे इथेनॉल मिश्रणासोबतच ईडीपीच्या प्रसाराला गती देणे हा प्रधान्यक्रम राहील.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री पुरी यांनी इथेनॉल मिश्रणाबाबात सांगितले की, अलिकडेच इथेनॉलसाठी एक निविदा जारी करण्यात आली होती. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इथेनॉल उत्पादनामुळे देशातील अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते का या प्रश्नाबाबत मंत्री पुरी म्हणाले, उसाशिावय जैव इंधनाच्या खरेदीसाठी अन्य पर्यायांवर विचार केला जात आहे. त्यामुळे तसे होणे शक्य नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link