बेगुसराय: मगध शुगर अँड एनर्जी लिमिटेडकडून १६ मार्चपासून उसाचे गाळप बंद करण्यात येणार आहे. कारखाना प्रशासनाने याची रितसर माहिती शेतकऱ्यांना दिली आहे. पाणी साठलेल्या शेतांतील ऊस तोडणी शेतकऱ्यांसमोर आव्हान ठरल्याचे कारखान्याच्या सूत्रांनी सांगितले.
कारखान्याच्या ऊस विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष शंभू प्रसाद राय यांनी उसाच्या कमतरतेमुळे दररोज सात ते आठ तास खंडीत गाळप सुरू असल्याचे सांगितले. कारखाना सुरळीत चालणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आतापर्यंत ५१ लाख ७९ हजार ३५ क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. चालू हंगाात उसाच्या गाळपाचे उद्दीष्ट ८० लाक टन निश्चित करण्यात आले होते. यावेळी गाळप क्षमता ५० हजार क्विंटल प्रतिदिनपर्यंत वाढविण्यात आली. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी खूप दिवस साचून राहिले. अशा ठिकाणचा ऊस तोडणे शेतकऱ्यांनाही शक्य झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कारखाना आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरला.